BJP Lok Sabha Candidate List : लोकसभेसाठी भाजपाची दुसरी यादी जाहीर! नितीन गडकरी, पंकजा मुंडेंना संधी

Continues below advertisement

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी (BJP candidate list) जारी केली आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांची नावं आहेत.   आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या यादीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आजच्या  यादीमध्ये महाराष्ट्रातील एकूण 20 उमेदवारांचा समावेश आहे.  नितीन गडकरी यांना नागपूर, नगरमधून सुजय-विखे पाटील, माढामधून रणजीत निंबाळकर, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram