Bhavana Gawali वाशिममध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करणार,भाजप आणि शिंदे गटातील अनेक नेते उपस्थित राहतील
Continues below advertisement
यवतमाळ-वाशिम या आपल्या मतदारसंघातून गेले वर्षभर गायब असलेल्या शिंदे समर्थक खासदार भावना गवळी आज वाशिममध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत... या मेळाव्यासाठी भाजप आणि शिंदे गटातील अनेक नेते उपस्थित राहतील... थोड्याच वेळात त्या घरातून निघतील आणि त्यानंतर रिठद इथं त्यांचं स्वागत होणार आहे.. त्यानंतर वाशिममध्य दुपारी १२ वाजता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. भावना गवळींच्या या मेळाव्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे, प्रवीण दरेकर आणि शहाजी बापू पाटील हे एका विशेष विमानानं पोहोचणार आहेत अशी माहिती आहे. या मेळाव्यात भावना गवळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय बोलणार याकडं लक्ष लागलंय....
Continues below advertisement