Bhavana Gawali:युती घट्ट करण्याचं काम आम्हीच केलं आहे.हिंदुत्वाचा नारा आम्ही हाती घेतला : भावना गवळी
आम्हाला गद्दार म्हटलं जात आहे, परंतु, आम्ही शिवसेना (Shiv Sena) सोडलेली नाही. आमच्या बापानं ही शिवसेना उभी केली आहे, असं वक्तव्य शिवसेनेच्या बंडखोर खासदार भावना गवळी (Bhavna Gawali) यांनी केलंय. भावना गवळी यांनी आज त्यांच्या वाशिम या मतदारसंघात सभा घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray ) यांच्यावर जोरदार टीका केली. भावना गवळी यांनी जाहीर सभा घेत यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं