Bharti Pawar Dindori Lok Sabha: दिंडोरीत उद्या मतदान, नाशिककर सज्ज; भारती पवार यांचं मतदारांना आवाहन
दिंडोरी लोकसभोची निवडणूक कांदा प्रश्नाभोवती केंद्रित झालीये. त्यामुळे ही लढत अटीतटीच्या वळणावर येऊन पोहचली आहे. मात्र मी निवडून आल्यानंतर कांदा प्रश्न हक्काने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सोडून घेईल असं आश्वासन भारती पवार यांनी दिलंय. यामुळे देश हितासाठी जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून उद्या मतदान करावं अशी प्रतिक्रिया भारती पवार यांनी दिलीय.
हे व्हिडिओ देखील पाहा
J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP Majha
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्याची.. शुरु मे हम अक्षम होंगे थोडा कम होंगे, आरएसएस की जरुरत पडती थी, आज हम बढ गये हैं, सक्षम हैं, तो बीजेपी अपने आप चलती है.. हे वक्तव्य आहे जे पी नड्डा यांचं.. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलंय. वाजपेयींच्या काळातील भाजप आणि सध्याच्या भाजप यातील फरक काय असा प्रश्न नड्डांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे तर भाजप हा राजकीय पक्ष आहे हे अधोरेखित करायला देखील जे पी नड्डा विसरले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झो़ड उठली.