Thackeray Group Belgaum :ठाकरे गटाकडून रॅली, कार्यकर्ते बेळगावकडे रवाना, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
आज बेळगावसह संपूर्ण सीमा भागामध्ये काळा दिन पाळण्यात येतो. या पार्श्वभूमीवर बेळगाव या रॅलीत सहभागी होण्यासाठी कोल्हापुरातून रवाना झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाका इथे शिवसैनिकांना अडवलंय.. तर काही जणांना ताब्यात घेतलंय.. बेळगाव प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते धर्मवीर संभाजी उद्यान येथे जमण्यास सुरुवात झालीये..