Mahadev Munde Case : मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर आम्ही समाधानी पण..ज्ञानेश्वरी मुंडे काय म्हणाल्या?
बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरण विधानसभेत गाजले. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर दिले. महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या संदर्भात कारवाई केली जात आहे, असे आश्वासन फडणवीसांनी ज्ञानेश्वरी मुंडेंना दिले. मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील उत्तरावर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आधी समाधान व्यक्त केले. मात्र, त्यांना न्याय हवा आहे. या प्रकरणातील आरोपींना एसीपींनी तात्काळ अटक करावी, अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्रीच न्याय देतील, असेही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले. ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या, "मुख्यमंत्री साहेबांच्या तोंडून माझ्या नवऱ्याला न्याय मिळतो हे मला जवाबशब्द देत गेला की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. ह्याच्यावर मी मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशावर मी समाधानी आहे. म्म्मी जे डोकाचं पाऊल उचललं परत उचलूनही म्हणून ते न्याय आपल्य्यापणी महाराष्ट्रातली एक महिला आहेत की म्हणजे न्याय मागण्यासाठी पेचेन आहे अन तिचेही लेकर अनाथ होऊन मुख्यमंत्री साहेबांनी जे योग्य निर्णय घेतला त्याच्यावर मी समाधान आहे अन एसपी साहेबांनीही आता तात्काळ आरोपी अटक करावोत आणि आम्हाला न्याय द्यावा."