Bachchu Kadu Amravati Rada : जिंकण्यासाठी नवनीत राणा अमराववीत दंगल घडवणार, बच्चू कडूंचा गंभीर आरोप
सलमान शेख
Updated at:
23 Apr 2024 07:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBachchu Kadu Amravati Rada : जिंकण्यासाठी नवनीत राणा अमराववीत दंगल घडवणार, असा आरोप प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. अमरावतीमधील सभेच्या मैदानाचा वाद आता तापला असून त्यामुळे प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu)आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाल्याचं दिसून आलं. पहिला आम्हाला परवानगी दिली आणि नंतर ती रद्द करून त्याच ठिकाणी अमित शाहांच्या सभेला परवानगी देण्यात आल्यामुळे आमदार बच्चू कडू संतापले. कायदा राखण्याचं काम करणाऱ्या पोलिसांनीच आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला. तसेच पोलिसांनी आपल्या गाडीवर भाजपचे झेंडे लावावेत, त्यांच्या सांगण्यावरूनच हे सगळं होतंय असा आरोपही बच्चू कडू यांनी केला.