Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात घमासान, विरोधक आक्रमक
महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तिघांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलाय..
भोंदूबाबा अशोक खरातमुळे रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षापदाचा राजीनामा द्यावा लागला.. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरही पाणी सोडावं लागण्याची शक्यता वर्तवली जातेय.. सर्वात आधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा पडला. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचा हात असल्याचं समोर आलं. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढू लागला. अखेर धनंजय मुंडेंनी अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सदनिका घोटाळा प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिला. त्यामुळे महायुतीचं सरकार सत्तेत येऊन दीड वर्षही झालं नाही आणि या काळात राष्ट्रवादीच्या तीन बड्या नेत्यांचे राजीनामे झाले..
विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्या सांगण्यावरुन राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सोमवती अमावस्येला अनामिका कापून घेतली होती असा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. सुषमा अंधारेंच्या या आरोपांवर बदनामी करणे, अश्लील टिप्पणी करणे, खोटे नरेटिव्ह सेट करणे, या सगळ्यांबाबत नोटिसा पाठवू असा इशारा चाकणकरांनी दिला यावर आज सुषमा अंधारेंनीही उत्तर दिलंय पाहूयात
रुपाली चाकणकर आणि भोंदू अशोक खरातविरोधात पुण्यात काँग्रेस महिला आघाडीने आंदोलन केलं. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदेंनी चाकणकरांची पाठराखण केली असताना काँग्रेस महिला आघाडीने आंदोलन केलं. सोबतच चाकणकरांची पाठराखण करणाऱ्या अरविंर शिंदेंच्या राजीनाम्याचीही मागणी केली.