Ashok Chavan Full PC : आधी अडखळले,नंतर सर्व पश्नांची उत्तरं; भाजप प्रवेशानंतर अशोक चव्हाण UNCUT

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan Joins BJP)  यांनी आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश  केला आहे.  पक्ष प्रवेश हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे मला कोणी जा असे सांगितले नाही. आजपर्यंत मी प्रामाणिकपणे काम केले असून पुढेही भाजपच्या (BJP) माध्यमातून करेल. आज  पुन्हा एकदा नव्या  राजकीय आयष्याची नवी सुरुवात करत आहे.भाजप देईल ते काम करायला मी तयार आहे. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना दिली आहे. अशोक चव्हाण म्हणाले,  विरोधात आणि सत्तेत असताना  देखील फडणवीसांचे आणि आमचे राजकारणापलीकडे सबंध होते. राज्यासाठी काम करताना आम्ही नेहमीच एकमेकांना साथ दिली आहे.  38 वर्ष काँग्रेसमध्ये राहून नवीन सुरुवात करत आहे. विकासाला सोबत घेऊन आम्ही एकत्र काम करत आहोत. देवेंद्र फडणवीसांनी नेहमी  आम्हाला साथ दिली. मी प्रामाणिकपणे भाजपमध्ये काम करेल.  राज्यात आगामी निवडणुकीत भाजपला कशा अधिक जागा मिळतील यासाठी काम करणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola