Bhandara : कोबीला दर नसल्याने शेतकऱ्याने चालवला ट्रॅक्टर : ABP Majha
शेतपिकांसोबत आर्थिक उन्नतीसाठी पालांदुरचे बागायतदार शेतकरी टिकाराम भुसारी यांनी शेतात पत्ताकोबीचा मळा लावून त्यात हजारो रुपयांचा खर्च केला. बाजारात कोबीला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा असताना जेव्हा कोबी बाजारात विक्रीसाठी नेली, तेव्हा त्यांना कोबी दोन रुपये किलो दराने विकावी लागली. त्यामुळे पत्ता कोबीवर केलेला खर्चही निघणार नसल्याने संतप्त शेतकरी भुसारी यांनी त्यांच्या पत्ता कोबीच्या मळ्यात ट्रॅक्टर चालवून कोबी उध्वस्त करीत रोष व्यक्त केला.