Arjun Khotkar Vs Kailash Gorantyal : अर्जुन खोतकर आणि काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्यात वाकयुद्ध
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppArjun Khotkar on Kailash Gorantyal: काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल (Congress MLA Kailash Gorantyal) आणि शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यात वाकयुद्ध रंगलय, गोरंट्याल यांनी काल केलेल्या टीकेला अर्जुन खोतकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस (Congress) आमदार कैलास गोरंट्याल म्हणजे, गटारगंगा असून लवकरच नगरपालिकेत झालेला भ्रष्टाचार बाहेर काढणार, असा इशारा अर्जुन खोतकरांनी दिला आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर आणि काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्यात वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे. फाटलेले कपडे घालून तुम्ही सायकलवर फिरत होतात, ठाकरे परिवारामुळे तुम्ही मोठे झालात, अशी टीका काल कैलास गौरंट्याल यांनी केली होती. याच टिकेला उत्तर देताना अर्जुन खोतकरांनी कैलास गोरंट्याल यांच्यावर निशाणा साधला आहे.