Antilia Explosives Case : अँटिलिया स्फोटकं प्रकरणाचं नेपाळ कनेक्शन समोर,एनआयएची एक टीम नेपाळला जाणार

Continues below advertisement

अँटिलिया स्फोटकं प्रकरणाचं नेपाळ कनेक्शन आता समोर आलंय.. या प्रकरणातील आरोपींपैकी ३ जण ९ आणि २० मार्च २०२१ दरम्यान नेपाळमध्ये वास्तव्यास होते.. त्याबद्दलचे पुरावे आता नेपाळमधून गोळा करण्यात येणार आहेत. त्यासाठी एनआयएची एक टीम नेपाळला जाणार आहे.. हे पुरावे देण्यासाठी नेपाळ सरकारला विनंती पत्र सादर करावं लागेल, हे विनंती पत्र केंद्र सरकारनं एनआयएकडे सुपुर्द केलंय. संतोष शेलार, सतीश मोठकुरी आणि मनीष सोनी या तिघांनी ४ मार्च २०२१ रोजी मनसुख हिरण यांची हत्या केली.. ९ ते २० मार्च दरम्यान ते फरार होते.. या काळात ते दिल्ली, नेपाळ आणि दुबईला जाऊन पुन्हा मुंबईत परतले, असं एनआयएनं आपल्या आरोपपत्रात म्हटलंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram