Amol Kirtikar Excusive : अर्ज भरण्यापूर्वी कीर्तिकर बाळासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करणार
abp majha web team
Updated at:
02 May 2024 11:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ठाकरे गट आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरताना मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. अमोल कीर्तिकर थोड्याच वेळात बाळासाहेब ठाकरे स्मारक इथे जाऊन अभिवादन करतील. त्यानंतर मातोश्रीपासून ते वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर मोठी रॅली काढली जाणार आहे. यामध्ये आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहतील