Amit Thackeray Meet Udayanraje Bhosale : अमित ठाकरेंनी घेतली उदयनराजेंची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.