Amit Shaha On New Law : भारतीय सुरक्षा संहिता विधेयक लोकसभेच्या पटलावर, अमित शाह यांनी मांडलं विधेयक

Continues below advertisement

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत भारतीय सुरक्षा संहिता विधेयक मांडलंय.
यात ब्रिटिशांच्या काळातील कायदे बदलण्यात आलेत. मुख्य म्हणजे IPCच्या ऐवजी भारतीय न्याय संहिता 2023, CRPCच्या ऐवजी भारतीय सुरक्षा संहिता 2023 आणि evidence act च्या ऐवजी भारतीय साक्ष्य अधिनियम 2023 हे बदल करण्यात आलेत. 
नव्या विधेयकात जुनी कलमे बदलली जाणार आहेत. आणि न्याय म्हणजे केवळ शिक्षा नाही, असंही प्रतिबिंबित केलं जाणार आहे. यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयपीसीचं कलम १२४-ए म्हणजेच राजद्रोहाचं कलम यातून वगळण्यात आलंय. शिवाय या विधेयकात गुन्हेगार घोषित झाल्यानंतर त्याच्या संपत्ती जप्त करण्याची तरतूद आहे. शिवाय सामूहिक गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षेची तरतूद आहे.
हे तीनही विधेयक चर्चा आणि संशोधनासाठी संसदेच्या प्रवर समितीकडे पाठवण्यात आलेत. 
निवडणुकीच्या दरम्यान मतदारांना पैसे वाटप केल्यास एक वर्षांच्या शिक्षेची तरतूद प्रस्तावित आहे. तसंच, मॉब लिंचिंगच्या प्रकरणांमध्ये फाशीची तरतूद करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram