Girish Mahajan : दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नात महाजनांनी हजेरी लावल्याचा आरोप : ABP Majha

Continues below advertisement

भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत. गिरीश महाजन हे दाऊदच्या एका नातेवाईकाच्या लग्नात उपस्थित होते. असा आरोप विरोधी पक्षाने केलाय. हे आरोप करताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक फोटोही पत्रकारांना दाखवलाय. दरम्यान, ज्या लग्नात गिरीश महाजन गेले होते त्या धर्मगुरु शहर-ए-खतीब यांचा दाऊदशी संबंध नाही, असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. तसेच, गिरीश महाजनांवर आरोप करताना खातरजमा करणं आवश्यक असल्याचंही फडणवीस म्हणालेत. त्यानंतर, स्वत: गिरीश महाजन यांनीही आपली बाजू मांडलीय. विरोधकांनी आपल्यावर खोटे आरोप केले असून, त्या लग्नाला २० ते २५ नेते उपस्थित होते. त्याचसोबत, मुलीकडच्यांचे दूरचे नातेवाईक दाऊदच्या जवळचे आहेत, त्यांचा दाऊदशी कोणताही संबंध नसल्याचं महाजनांनी म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram