Yugendra Pawar Marriage : युगेंद्र पवारांचा विवाह सोहळा, अजित पवार उपस्थित राहणार ?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार आज विवाह बंधनात अडकणार आहेत. मात्र या विवाह सोहळ्याला अजित पवार उपस्थित राहणार का असा प्रश्न विचारला जातोय. त्याचं कारण असे की आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दिवसभर प्रचार दौरे आहेत. सकाळी दहा वाजता भोर येथून प्रचाराला सुरुवात होणार आहे. त्यानंतर दौंड, इंदापूर, माळेगाव, बारामती या ठिकाणी ते प्रचारसभा घेणार आहेत. बारामतीतील प्रचार सभेची वेळी ही सायंकाळी साडेसहा वाजताची आहे. तर युगेंद्र पवारांचं लग्न पाच वाजून १५ मिनिटांनी आहे. अजित पवारांचे नियोजित कार्यक्रम बघता ते विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता कमी दिसतेय.. दरम्यान काल जय पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार संगीताच्या कार्यक्रमाला उपस्थित होते असं सांगण्यात येतंय....मात्र आजच्या विवाह सोहळ्याला अजित पवार अजित पवार हजेरी लावतात का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.