Ajit Pawar on Supriya Sule : ही भावकिची निवडणूक नाही, अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

Continues below advertisement

अजित पवारांनी पवार कुंटुंबीयांवर निशाणा साधला. अजित पवार म्हणाले,   प्रचाराच्या रणधुमाळीत माझ्यावर वेगवेगळ्या आरोपाचा धुराळा उडवला आहे . मी त्या गोष्टीला जास्त महत्त्व देत नाही. मी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूकीत ही निवडणूक प्रचार केला. या मतदारसंघात आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे  मी शेवटच्या सभेपर्यंत सांगितले की, ही भावकिची गावकीची निवडणूक नाही. ही निवडणूक  देशाचे भवितव्य ठरवणारी तसेच पुढील पाच वर्षाचा विकास हे डोळ्यासमोर ठेवूनच मतदान करा  असे मी शेवटपर्यंत सांगितले आहे.

आज माझी  आई माझ्यासोबत... : अजित पवार

अजित पवार सातत्याने  शरद पवारांच्या वयावरुन सातत्याने टीका करत आहे.  आज बारामतीत मतदान केल्यानंतर अजित पवारांनी  मतदान केल्यानंतर पुन्हा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. आमच्या घरात सर्वात ज्येष्ठ  आशाताई अनंतराव पवार आहेत. आज माझी  आई माझ्यासोबत आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी, असे म्हणत अजित पवारांनी टोला हाणला आहे.   

राज्यात आज तिसऱ्या टप्प्यात मतदान

राज्यात आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होतंय. 11  मतदारसंघात मतदान पार पडतयं.. बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी अजित पवारांसह कुटुंबासोबत आपला मतदानाचा हक्क बजावला. अजित पवार,  मुलगा पार्थ पवार काटेवाडी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी  देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram