Ajit Pawar Security : अजित पवार यांच्या सुरक्षेत मोठी वाढ, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सुरक्षेत आज अचानक वाढ करण्यात आलीय. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमधे अजित पवार सध्या विकास कामांबाबत बैठक घेतायत. एरवी जनता दरबारावेळी अजित पवार प्रत्येकाला भेटत असतात. मात्र आज त्यांच्याकडे कामे घेऊन येणाऱ्यांना अजित पवारांना भेटू दिले जात नाहिए. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक , तीन पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक आणि मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत. छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याच्या आणि त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा वाढवण्यात आलीय.