Ajit Pawar Baramati : बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या अडचणी वाढल्या : ABP Majha
बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. अजित पवारांविरोधात मतदारसंघातली जुनी दुखणी नव्याने उफाळून आली आहेत. विजय शिवतारे यांनी अपक्ष लढण्यावर ठाम असल्याचं सांगितलं. तर इंदापूर मतदारसंघात हर्षवर्धन पाटलांनीही अजित पवारांविरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे बारामती मतदारसंघात राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार उभ्या राहिल्यास महायुतीच्या अडचणी वाढत असल्याचं दिसतंय. यावर आता तोडगा काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली. आपली नाराजी नाही, मात्र कार्यकर्त्यांच्या भावना फडणवीसांना पोहोचवल्या असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे भोर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे यांच्या भेटीला विजय शिवतारे दाखल झाले. पुण्यात यांनी कोणालाच मोठं होऊ दिलं नाही, यांची मानसिकता खोटी आहे असं शिवतारेंनी थोपटेंना सांगितलं.