Ajit Pawar :परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बवर उपमुख्यमंत्र्यांचं मौन, कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार
मुंबई : राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था तसेच महाविकास आघाडीच्या सावळ्या गोंधळाच्या कारभाराची लक्तरे आता परमबीर सिंह यांच्या 'लेटर बॉम्ब'मुळे वेशीवर मांडली जात आहेत. अॅन्टिलिया स्पोटक तपासावरुन सुरु झालेले हे प्रकरण नंतर मनसुख हिरण, सचिन वाझे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यापासून आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांपर्यंत पोहचलं आहे.