Ajit Pawar-Fadnavis Meets | देवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबद्दल अजित पवार काय म्हणाले? | बारामती | ABP Majha
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेजारी बसलो बसलो म्हणजे काही तरी सुरू झालं समजण्याचं कारण नाही. शेजारी बसून हवापाण्याच्याच गप्पा मारल्या असं मिश्किल उत्तर अजित पवारांनी दिलंय. बारामतीमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर ते बोलत होते. खातेवाटप हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असून तेच याबाबत सांगतील असंही ते म्हणालेत. सिंचन घोटाळ्यातील क्लीन चिटबाबतही बोलण्यास त्यांनी नकार दिला.