Ajit Pawar on Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात पक्षश्रेष्ठींशी चर्चा करुन निर्णय घेतील - अजित पवार
Ajit Pawar on Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात पक्षश्रेष्ठींशी चर्चा करुन निर्णय घेतील - अजित पवार
Balasaheb Thorat vs Nana patole : काँग्रेसमधील अंतर्गत कलह सध्या विकोपाला गेल्याचं समोर आले आहे. नाना पटोले यांची हायकमांडकडे तक्रार केल्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलाय. थोरातांना आपला राजीनामा हायकमांडकडे का पाठवावा लागला? यामागे नेमकी कारणं काय आहेत? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नुकतीच भारत जोडो यात्रा पूर्ण केली. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा पूर्ण केली. 'नफरत छोडो ....भारत जोडो' ही घोषणा राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत दिली होती. 'नफरत छोडो ....भारत जोडो' ही घोषणा कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत सर्वांनाच ऐकायला मिळाली. भाजपला उद्देशून ही घोषणा देत असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कमालीची नफरत वाढताना पाहायला मिळते. महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत वाद विकोलापाला गेलाय.