Ajit Pawar Full PC : कोणाच्या लग्नाला गेलो म्हणून मला कसं दोषी ठरवता? अजितदादांचा संतप्त सवाल

मीडियाला माहिती नाही पण दुर्दैवाने वेगवेगळ्या चॅनलचे काही अँकर कारण नसताना माझ्या नावाची बदनामी करून मला त्याच्यात टार्गेट करतात, माझा दुरान्वय यात संबंध नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते आज पत्रकारांशी बोलत होते. 

कोणाच्या लग्नाला गेलो म्हणून मला कसं दोषी ठरवता? असा संतप्त सवाल देखील अजितदादांचा उपस्थित केला. वैष्णवी हगवणेंच्या आरोपींना अजिबात सोडू नका, असं आदेश देखील अजित पवारांनी पोलिसांना दिलं आहे. या प्रकरणी मी वैष्णवीच्या घरच्यांची भेट घेतल्याचंही अजित पवार म्हणाले.

आपली पोलीस यंत्रणा इतकी सक्षम आहे की, आरोपीला पाताळातून देखील शोधून काढू शकतो. पण मी सांगतो की, या प्रकरणात माझा काहीही संबंध नाही, असं स्पष्ट मत अजित पवारांनी उपस्थित केला. 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola