Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला

Continues below advertisement

Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला

Manirao Kokate Resignation Accepted by Ajit Pawar मुंबई : उपमुख्यमंत्री अजि पवार यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारल्याचं जाहीर केलं आहे.  माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारावा, असं पत्र अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला आहे. अजित पवार यांनी एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. त्या पोस्टद्वारे अजित पवार यांनी राजीनामा स्वीकारल्याची माहिती दिली. आता देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद अधिकृतपणे जाईल.

अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला

माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी  माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत, या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारण्यात आला आहे, असं अजित पवार म्हणाले.

संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी  माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आला आहे.

सार्वजनिक जीवन हे नेहमीच संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं, या मूल्यांवर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल राहिली आहे. कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास आहे. राज्यात कायदा-व्यवस्थेचं काटेकोरपणे पालन होईल, याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. लोकशाही मूल्ये जपली जातील व जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्या दृष्टीकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान,  देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र पाठवून माणिकराव कोकाटे यांच्याकडील खाती अजित पवार यांच्याकडे देण्यास सांगितलं होतं.त्या पत्राला आचार्य देवव्रत यांनी मंजुरी दिली होती. त्यामुळं कालपासून माणिकराव कोकाटे हे बिनखात्याचे मंत्री होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola