Ajit Pawar On Farmer : पंचनामे आवरा, पोशिंद्याला सावरा , आजच शेतकऱ्यांना मदत करा : विरोधक
Continues below advertisement
शासकीय कर्मचाऱ्यांच्या संप आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ९५ टक्के शासकीय कर्मचाऱ्यांकडे हरामचा पैसे आहे, असं विधान केलं होतं. दरम्यान, यावरून आज विरोधी पक्षनेते अजित पवार विधानसभेत चांगलंच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्याच्या पंचनाम्याच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं.
Continues below advertisement