Ajit Pawar On CM Banner : बॅनर लावून कोणीही मुख्यमंत्री होत नाही, मुख्यमंत्री पदाचे बॅनर लावू नये
गेल्या काही दिवसांत राज्यात विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात जाणार या चर्चांना अक्षरश: उत आला होता.. एवढंच नाही तर राज्यात अनेक ठिकाणी काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी दादा भावी मुख्यमंत्री होणार असे बॅनरच झळकवले... मात्र त्यानंतर दादांनी स्पष्टीकरण दिलं आणि बॅनर हटवले गेले..यानंतर आता पुन्हा एकदा धाराशिवमध्ये पुन्हा एकदा दादांचे बॅनर झळकल्यानं चर्चांना उधाण आलंय. धाराशीवच्या तेर गावातल्या चौका चौकात तेर चे जावई ,आमचे नेते जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार अश्या आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत... दादांच्या सासरवाडीतच असे बॅनर झलकल्यानं आता पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्यात...