Praful Patel Rajya Sabha : विद्यमान राज्यसभा खासदार पटेल राजीनामा देऊन अर्ज भरणार
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. पटेल हे आधीच राज्यसभेचे खासदार आहेत. ते आधी राजीनामा देतील आणि मग आज पुन्हा अर्ज भरतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले. काही तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय घेतला आहे, याहून अधिक आता सांगणार नाही असंही तटकरेंनी सांगितलं. पटेल यांच्या राजीनाम्याने जी जागा रिक्त होईल, तिथे राष्ट्रवादीच उमेदवार देईल, असंही पक्षाकडून जाहीर करण्यात आलं आहे.
Continues below advertisement