Ajit Pawar's MLA Called Supriya Sule : अजित पवार गटाच्या नाराज आमदारांचा सुळेंशी संपर्क?

लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात राजकीय भूकंपाची चिन्हं असून पहिला भूकंप हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याची चिन्हं आहेत. सुप्रिया सुळे या निवडून आल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या निमित्ताने अजित पवारांचे दहा आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या अभिनंदनासाठी  अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 आमदारांनी शुभेच्छा संदेश पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

10 आमदारांचा सुप्रिया सुळेंना मेसेज

अजित पवारांच्या नाराज आमदारांनी सुप्रिया सुळेंना संदेश पाठवले आहेत. आमदारांनी अभिनंदनपर संदेश करत सुप्रिया सुळेंशी संपर्क साधायचा प्रयत्न  केला असल्याची माहिती  विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यामुळं  अजित पवारांचे नाराज आमदार परतीच्या वाटेवर आहेत का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. किमान १० आमदारांनी परतीसाठी पवार गटाच्या नेत्यांशी संपर्क साधल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola