NCP Not Involved in Cabinet : अजितदादा-फडणवीसांमधील बैठक संपली, मंत्रिपदावर तोडगा निघणार?

Continues below advertisement

नवी दिल्ली :  राजकीय गोटातून सर्वात मोठी बातमी... अजित पवारांच्या (Ajit Pawar)  राष्ट्रवादील (NCP)  मंत्रिपद मिळणार नसल्याची सध्या चर्चा सुरू आहे.. यासंदर्भात सुनील तटकरेंच्या (Sunil Tatkar) निवासस्थानी बैठक झाली.  यानंतर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आता सुनील तटकरेंच्या निवासस्थानी पोहचलेत. दरम्यान काही वेळापूर्वी मंत्रिपदासाठी अद्याप फोन आला नसल्याची माहिती प्रफुल्ल पटेलांनी (Praful Patel)  एबीपी माझाला दिली.  यानंतर आता फडणवीस तटकरेंच्या घरी पोहचलेत त्यामुळे राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे.

 अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत सुनील तटकरेंच्या घरी बैठक सुरू आहे. या बैठकीला पफुल पटेल देखील पोहचले आहे. अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्री पद मिळालेले नाही. प्रफुल पटेल यांचे नाव मंत्रिपदासाठी नाव आघाडीवर होते.त्यांना फोन येईल अशी अपेक्षा होती, परंतु दुपारी 12 पर्यंत पटेलांना फोन आलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला अद्याप मंत्रिपद मिळालेले नाही, असे स्पष्ट होत आहे. त्यात देवेंद्र फडणवीस देखील सुनील तटकरेंच्य निवासस्थानी पोहचले आहेत.त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram