Sharad Pawar Meet Ajit Pawar : पवारांचा वाढदिवस, अजितदादा भेटीला; सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, अजित पवारांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. यावेळी सुनेत्रा पवार, सुनिल तटकरे, भुजबळ, प्रफुल पटेलही उपस्थित.
अजितदादाआणिशरद पवारांच्या भेटीनंतर अखंड राष्ट्रवादीच्या चर्चा सुरु
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी शरद पवारांची 85 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात सर्वांनीच भुवया उंचावल्याचं पाहिला मिळालं. या भेटीमुळे पुन्हा एकदा अखंड राष्ट्रवादीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह शरद पवारांची आज सकाळी दिल्लीत भेट घेतली. प्रथमदर्शनी ही वाढदिवसानिमित्त भेट घेतली अशी माहिती सांगण्यात येत असली तरी यामागे आगामी काळातील राजकीय समीकरणं असू शकतात अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Continues below advertisement