Ajit Pawar Meet Sharad Pawar : काका-पुतण्या भेट, परिवर्तन घडणार?
दिल्लीमध्ये झालेल्या एका भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचा अंदाज वर्तवला जातोय.. ही भेट होती अजित पवार आणि शरद पवारांची... शरद पवारांच्या ८४व्या वाढदिवसानिमित्त, अजित पवारांनी सहकुटुंब दिल्लीत त्यांची भेट घेतली.. आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या.. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, अजित पवारांनी पहिल्यांदाच दिवाळीत शरद पवारांची भेट घेतली नाही.. त्यांनी वेगळा पाडवा साजरा केला.. पण जे महाराष्ट्रात दिवाळीनिमित्त जमलं नाही.. ते वाढदिवासानिमित्त दिल्लीत घडलं.. सुनेत्रा पवार, पार्थ पवारांच्या स्वागताला स्वत: सुप्रिया सुळे बाहेर आल्या... त्यांनी सर्वप्रथम सुनेत्रा पवारांना आलिंगन दिलं.. त्यानंतर पार्थ पवारचा मुका घेतला... यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी नेते भुजबळ, तटकरे, प्रफुल पटेलही उपस्थित होते.. या सर्वांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.. शरद पवार आणि अजित पवारांमध्ये तब्बल पस्तीस मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली...