NCP | अजित पवार राष्ट्रवादीत सक्रीय | Ajit Pawar | ABP Majha
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन परत स्वगृही परतले आहेत. आता ते पुन्हा राष्ट्रवादीत सक्रीय झाले आहेत. काही वेळाने ते महाविकास आघाडीच्या बैठकांमध्येदेखील सहभागी होतील. उद्या (28 नोव्हेंबर) महाविकास आघाडीचे नेते मंत्रीमंडळाची शपथ घेणार आहेत. यावेळी अजित पवार यांना मंत्रीपद मिळणार का? असे प्रश्न सर्वांना पडले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीतही अजित पवारांना याबद्दल विचारण्यात आले. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, माझ्या मंत्रीपदाचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घेतील.