Ajit Pawar Full PC On NCP : बंडानंतरचा पहिला मोठा विजय! पक्ष-चिन्ह मिळाल्यानंतर दादा UNCUT
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar Full PC On NCP : बंडानंतरचा पहिला मोठा विजय! पक्ष-चिन्ह मिळाल्यानंतर दादा UNCUT
मुंबई: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या बाजूने लागल्यानंतर आता शरद पवार गटाने चार चिन्हांची निश्चिती केल्याची माहिती समोर येत आहे. त्यापैकी एका चिन्हाची निवड करून बुधवारी निवडणूक आयोगाला त्याची माहिती देण्यात येणार असल्याची माहिती आहे. शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शरद पवार (Sharad Pawar) गटाला आपल्या नव्या पक्षाचं नाव आणि चिन्हाची सूचना देण्याची मुदत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने या आधी शिवसेनेचा निकाल देताना शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह दिलं होतं. तशाच प्रकारचा काहीसा निर्णय राष्ट्रवादीच्या बाबतीत येऊ शकतो अशी काहीशी शंका शरद पवार आणि त्यांच्या नेत्यांना होती. त्यामुळेच जर पक्ष चिन्हाचा निकाल अजित पवार गटाकडून लागलाच तर काय करायचं हे धोरणही आधीच ठरल्याची माहिती समोर येतेय.