MVA Leaders Security Removed : Ajit Pawar, Dilip walse Patil यांच्यासह अनेक नेत्यांची सुरक्षा काढली

Continues below advertisement

महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी. शिंदे-फडणवीस सरकारनं विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करून विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे शिवसेनेतल्या ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा मात्र वाढवण्यात आली आहे. नार्वेकरांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्याउलट अजित पवार यांची झेड प्लस श्रेणीतून वाय प्लस करण्यात आली आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram