Sanjay Shirsat On Nawab Malik : मुस्लिम मतासाठी अजित पवारांनी नवाब मलिकांना जवळ केलं : संजय शिरसाट
नवाब मलिकांची दुसऱ्या दिवशीही सभागृहात एन्ट्री वादग्रस्त ठरली.. सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या मलिकांवरून सध्या महायुतीमध्येच ओरड सुरू झालीय.. अजित पवारांना फडणवीसांच्या ओपन लेटरनंतर, एकनाथ शिंदे गटाकडूनही अजित पवारांवर निशाणा साधण्यात आलाय.. मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी अजित पवार गटाने मलिकांना जवळ केल्याचा आरोप, संजय शिरसाटांनी केलाय.. तर प्रफुल्ल पटेलांनी आम्ही धर्मनिरपेक्ष असल्याचं स्पष्ट केलंय..