Ajit Pawar and Jayant patil : अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामधील संघर्ष वाढणार?: ABP Majha
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यातला संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हं आहेत. कारण जयंत पाटील यांच्या मतदारसंघात येऊन अजित पवारांनी महाडिक गटाला ताकद देण्याचे संकेत दिलेत. सांगलीतील पेठ नाका येथे नानासाहेब महाडिकाच्या पुतळ्याला अभिवादन करताना अजित पवारांनी हे संकेत दिले. महाडिक बंधू आणि जयंत पाटील हे कट्टर राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे आता तालुक्यातील राजकीय समीकरणं बदलणार असं दिसतंय.