#Congress राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेसने दिशा गमावली, प्रणव मुखर्जींच्या पुस्तकात दावा
Continues below advertisement
नवी दिल्ली : सतत होत असलेल्या पराभवामुळं पिछाडीवर आलेल्या काँग्रेसमधील नेत्यांवर आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभ राहत असताना आता माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकातून काँग्रेस नेतृत्वावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन ऑगस्ट महिन्यात झालं. त्यांनी 2014 च्या काँग्रेसच्या पराभवाला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना जबाबदार धरलं आहे. त्यांनी या पुस्तकात लिहिलं आहे की, काँग्रेसचे काही सदस्य असं मानत होते की जर ते पंतप्रधान झाले तर पक्षाच्या हातून सत्ता गेली नसती. 'द प्रेसिडेंशियल इयर्स' या आपल्या पुस्तकातून त्यांनी हे गौप्यस्फोट केले आहेत.
Continues below advertisement
Tags :
Pranab Mukherjee Death Reason RIP Pranab Mukherjee Pranab Mukherjee Death Pranab Mukherjee Congress