Pratap Sarnaik :दौऱ्यातली इच्छा पूर्ण झाल्यानं कामाख्यादेवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला जाणार :सरनाईक

Continues below advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदार आणि खासदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख निश्चित झाली आहे. कामाख्यादेवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री आणि त्यांचे समर्थक आमदार-खासदार खरं तर काल गुवाहाटी दौऱ्यावर जाणार होते. पण त्यांच्या गुवाहाटी दौऱ्याच्या वेळापत्रकात ऐनवेळी बदल झाला. आता या दौऱ्याची नवी तारीख शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, शिंदे आणि त्यांचे समर्थक २६ नोव्हेंबरला गुवाहाटी दौऱ्यावर जाणार आहेत. शिवसेनेतल्या बंडानंतर झालेल्या गुवाहाटी दौऱ्यात सरकार स्थापनेची इच्छा शिंदे गटाकडून कामाख्यादेवीसमोर बोलून दखवण्यात आली होती, असं बोललं जात आहे. त्यामुळं मागच्या दौऱ्यातली व्यक्त केलेली इच्छा पूर्ण झाल्यामुळंच शिंदे गटा पुन्हा कामाख्यादेवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला जाणार असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram