Aaditya Thackeray On CM Eknath Shinde : शिंदेंच्या बंडाबाबत आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट : ABP Majha

एकनाथ शिंदे यांनी बंड का केले, याबाबत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.. एकनाथ शिंदे यांनी बंड करण्यापूर्वी तेे मातोश्रीवर येऊन रडले होते, भाजपसोबत गेलो नाही तर आपल्याला अटक होईल असं त्यांनी सांगितल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.... आदित्य ठाकरे यांनी काल एका कार्यक्रमात हा गौप्यस्फोट केल्यानंतर राजकारण चांगलंच खवळलंय... शिवसेना, ठाकरे गट, आणि भाजपच्या नेत्यांनी जोरदार टीकास्त्र डागण्यास सुरुवात केलेय. या सगळ्यात मुख्यमंत्री शिंदेंचीही प्रतिक्रिया आलेय.. आदित्य ठाकरे लहान आहेत.. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असं म्हणत त्यांनी या संपूर्ण विषयावर चर्चाच थांबवलेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola