Aaditya Thackeray : गोव्यात पहिल्याच सभेत आदित्य ठाकरेंची 'गोव्याची शान, धनुष्य बाण' अशी घोषणा
गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीचे मतदान चार दिवसांवर उरलेले असताना महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे गोवा दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांनी गोव्यात पहिल्याच सभेत 'गोव्याची शान, धनुष्य बाण' अशी घोषणा केली आहे.