Tunisha Sharma Case : अभिनेत्री तुनिशा शर्मा प्रकरणातील आरोपी 'शिजानची आई 'एबीपी माझा'वर

Continues below advertisement

Tunisha Sharma Latest News:  हिंदी टेलिव्हिजन मालिकांमधली अभिनेत्री तुनिशा शर्मानं (Tunisha Sharma) काल आत्महत्या केली. वसईनजिकच्या नायगावमध्ये एका मालिकेचं शूटिंग सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात तुनिषाच्या मृत्यूचं कारण गळफास हेच असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी स्पष्ट केलं आहे. तिच्या आईचं म्हणन होतं की, शीझानचं आणि तुनिषाचा ब्रेक अप झालं होतं. त्यामुळं ती नैराश्यात गेली होती. शवविच्छेदन अहवालात गरोदर असल्याबाबत पुष्टी करण्यात आलेली नाही. तसंच लव्ह जिहादचाही काही अँगल नसल्याचं जाधव यांनी म्हटलं आहे. तिच्या हातावर जे बॅन्डेज लावले होते. शीझान खानला 28  डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असल्याच एसीपी जाधव यांनी म्हटलं आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram