Govinda join Shiv Sena: उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात गोविंदा रिंगणात उतरणार
सलमान शेख
Updated at:
22 Mar 2024 02:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : नव्वदच्या दशकात चित्रपटसृष्टी गाजवणारं सिनेसृष्टीतील नाव म्हणजे, गोविंदा. आता अभिनेता गोविंदा (Bollywood Actor Govinda) पुन्हा एकदा राजकारणात (Maharashtra Politics) एन्ट्री करणार असल्याचं बोललं जात आहे. यंदा गोविंदा लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील (Mumbai Lok Sabha Election) उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी (North West Lok Sabha Constituency) गोविदांचं नाव चर्चेत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून (Shiv Sena) गोविंदा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. त्यासाठी लवकरच गोविंदा शिंदेच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणार आहे, अशी माहिती मिळत आहे.