Abhijit Karande Center Point On Andheri East ByPolls 2022 : अंधेरी पूर्वचा सामना कोण जिंकणार?

Abhijit Karande Center Point On Andheri East ByPolls 2022 : पोटनिवडणुकांचा महाराष्ट्रातला आधीचा आणि आत्ताचा ट्रेंड यात फरक पडलाय.म्हणजे विद्यमान आमदाराचं आकस्मिक निधन झालं तर बहुतेकवेळा त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीला इलेक्शन जवळपास बाय दिली जायची..आर.आर.पाटील, पतंगराव कदम यांच्या निधनानंतर सुमनताई किंवा विश्वजीत यांची निवडणूक बिनविरोध झाली होती.पण पंढरपुरात भारत भालके किंवा देगलूरमध्ये रावसाहेब अंतापूरकरांच्या निधनानंतर अटीतटीच्या निवडणुका झाल्या.पंढरपुरात तर भालकेंच्या मुलाला भगीरथ भालकेंना सहानुभुतीचाही फायदा झाला नाही.म्हणजे प्रत्येकवेळी बाय देण्याचाही ट्रेंड राहिला नाही आणि प्रत्येकवेळी सहानुभुती कामाला येईल असंही नाही.त्यामुळेच इमोशन्सचा विचार आपण करुच पण त्यापुढे जाऊन जरा अंधेरीची नेमकी गणितं काय आहेत हेसुद्धा समजून घ्यावं लागे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola