Abdul Sattar Hotel Leela Mumbai : द्रौपदी मुर्मू उद्धव ठाकरे यांना भेटण्याची शक्यता आहे
Continues below advertisement
एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबईत दाखल झाल्या आहेत. भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांसोबत त्यांची बैठक होणार आहे. अंधेरीतल्या लीला हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पाठिंबा जाहीर केलाय. याआधी शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केलेल्या उमेदवारांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यामुळे द्रौपदी मुर्मूदेखिल मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार का याकडे लक्ष लागलंय. तूर्तास त्यांच्या ठाकरेंबरोबर भेटीचा कोणताही कार्यक्रम ठरलेला नाही.
Continues below advertisement