AAP Loksabha Election : दिल्लीत आप चार जागी, काँग्रेस तीन जागांवर लढणार : ABP Majha
लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांची हातमिळवणी केलीय. आप आणि काँग्रेसने एकत्र पत्रकार परिषद घेत आघाडीची घोषणा केली. चार राज्यातलं जागावाटप जाहीर करण्यात आलं. त्यानुसार दिल्लीत ४ जागांवर आप तर काँग्रेस ३ जागांवर लढणार आहे. हरियाणात काँग्रेस कुरूक्षेत्रची जागा लढेल. हरियाणात काँग्रेस ९ तर आप १ जागा लढवेल तर गुजरातमध्ये भरूच आणि भावनगरची जागा आप लढणार आहे. गुजरातमध्ये काँग्रेस २४ तर आप २ जागांवर लढणार आहे. तर गोव्यात दोन्ही जागा काँग्रेस लढेल. पंजाबमध्ये आपची सत्ता आहे. मात्र तिथे आघाडी करण्यात आलेली नाही. पंजाबमध्ये दोन्ही पक्ष वेगवेगळे लढणार आहे.