Aaditya Thackeray आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर, शिवरायांच्या पुुतळ्यावर अनावरण :ABP Majha
आदित्य ठाकरे आज मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर जातायेत.त्यासाठी ते थोड्याच वेळात नागपूरमध्ये दाखल होतील, आणि त्यानंतर लगेच मध्य प्रदेशातील पांढूर्णासाठी रवाना होतील. मध्य प्रदेशाच्या छिंदवाडा जिल्ह्यातील पांढुर्णा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या अनावरणासाठी आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. पुतळ्याचं अनावरण ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, आणि त्यांचे खासदार पुत्र नकुलनाथ यांच्या हस्ते होणार आहे.