Aaditya Thackeray And Sandeep Deshpande : हात मिळवला, खळखळून हसले;आदित्य ठाकरे-संदीप देशपांडेंची भेट

Aaditya Thackeray And Sandeep Deshpande : हात मिळवला, खळखळून हसले;आदित्य ठाकरे-संदीप देशपांडेंची भेट

मुंबई : शिवसेना आमदार आणि नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची आणि मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आज मुंबईतील (mumbai) एका कार्यक्रमात एकमेकांशी हस्तांदोलन केले. यावेळी दोघांनी एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सकाळीच संदीप देशपांडे (Sandeep deshpande)आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांची एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. या भेटीत 5 जुलै रोजी मराठीच्या मुद्द्यावरुन आणि शाळेतील हिंदी सक्तीला विरोध दर्शवत होणाऱ्या मोर्चासंदर्भाने चर्चा झाली. त्यानंतर, आता विधानसभा निवडणुकीला एकमेकांविरुद्ध उभे ठाकणाऱ्या आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या मुद्द्यावर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच, मराठीच्या मुद्द्यावरुन शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे, अखेर दोन बंधु एकत्र येत असल्याच्या चर्चा घडत असतानाचा शिवसेना व मनसेतील दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नेते एकत्र भेटून हस्तांदोलन करत आहेत. एकमेकांशी संवाद साधत असल्याने आता कार्यकर्त्यांची इच्छा पू्र्ण होणार का, असा प्रश्नही चर्चेत आहे. संदीप देशपांडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांच्यासोबतही भेट घेत फोटोशूट केले. त्यामुळे, एकमेकांवर टीका करणाऱ्या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांच्या प्रवक्त्यांच्या भेटीगाठी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola