Amruta Fadnavis Case : जयसिंघानीच्या अटकेनंतर 15,000 कोटींचे मॅचफिक्सिंगचे मोठे नेटवर्क उघडकीस

Continues below advertisement

अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात अटक झालेला बुकी अनिल जयसिंघानीच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.. कारण त्याच्याबद्दल अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे.. अनिल जयसिंघानीच्या अटकेनंतर 15,000 कोटींचे मॅचफिक्सिंगचे मोठे नेटवर्क उघडकीस आलंय. या रॅकेटमध्ये अनेक क्रिकेटपटू, आयपीएल फ्रँचाईसी, मालक आणि पोलिसांचा समावेश आहे.  भ्रष्टाचार, ब्लॅकमेलिंग, मॅचफिक्सिंग आणि हवालाचे मोठे रॅकेट उघडकीस येतंय. आणि या सगळ्याचा थेट संबंध पाकिस्तान आणि दुबईतील क्रिकेट बेटिंग कार्टेलशी असल्याचं देखील तपासात समोर आलंय. जयसिंघानीची एक ऑडिओ क्लिपही समोर आलीये. यामध्ये तो रमेश या फरार बुकीला मुंबई आणि ठाण्यात क्रिकेट बेटिंग करण्यासाठी प्रोत्साहन देतोय. माझे स्वत:चे ठाणे आणि शिर्डी येथे थ्रीस्टार हॉटेल आहे. स्थानिक पोलिसांशी माझे चांगले संबंध आहेत आणि सुरक्षेसाठी दोन शस्त्रधारी गार्ड पण उपलब्ध करुन देतो असं जयसिंघानी या रमेश नावाच्या बुकीला सांगतोय 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram