Uddhav Thackeray vs Eknath Shinde : मविआच्या गैरहजर 13 आमदारांनाही सरकार नको होतं : कौल
Continues below advertisement
आज सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी युक्तिवाद केला...२३ जूनला अपात्रतेच्या याचिकेपासून सुनील प्रभूंनी जारी केलेल्या व्हिपपर्यंत, बहुमत चाचणीपासून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत संपूर्ण घटनाक्रमाचा आढावा आज पुन्हा एकदा कोर्टात मांडण्यात आला... पक्षात फूट पडलेली नसून पक्षातील नाराज असलेल्यांचा एक गट खरी शिवसेना असल्याचा दावा कौल यांनी कोर्टात केला.. दरम्यान विश्वासदर्शक ठरावावेळी गैरहजर राहणाऱ्या मविआतील १३ आमदारांच्या कृत्याबाबतही संशय घेण्यात आला... १३ आमदारांच्या कृतीचा शिंदे गटानं बचावासाठी दाखला दिला.. विश्वासदर्शक ठरावादरम्यान मविआतले १३ आमदार गैरहजर का राहिले... त्यांनाही सरकार नको होतं असा युक्तिवाद कौल यांनी केला
Continues below advertisement